पासपोर्टसाठी आता कार्यालयात जाण्याची गरज नाही, घराच्या जवळच पासपोर्ट काढून मिळणार

परदेशी प्रवास करण्याकरीता पासपोर्ट हा अत्यंत महत्वाचा दस्तावेज मानला जातो. पासपोर्टशिवाय परदेशी प्रवास करता येत नाही. पासपोर्ट काढताना काही वेळेस एकाच फेरीत काम होते मात्र काही वेळेस पासपोर्ट ऑफिसमध्ये अनेक फेऱ्या मारल्या तरी काम होत नाही. आता पासपोर्ट काढण्यासाठी पासपोर्ट ऑफिसमध्ये सतत फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.  यावर आता सरकारने परराष्ट्र मंत्रालयातर्फे चंदिगड भागात पासपोर्ट कार्यालयाओऐवजी एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. त्यामुळे पासपोर्ट सेवा सर्विस एक्सलेंस व्हॅन तुमच्या दारापाशी येणार आहेत.

या व्हॅन सर्विसमुळे अर्जदाराला कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. परराष्ट्र मंत्रालयाने सर्व्हिस एक्सलंस व्हॅनसह 4 पासपोर्ट सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. गुरूवारपासून सुरू केलेल्या या सेवेचा लाभ घेत पहिल्याच दिवशी 80 उमेदवारांनी अर्ज केले. या पासपोर्ट सेवेचा मोठा फायदा म्हणजे पासपोर्ट मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना बायोमेट्रीकसाठी वाट पाहावी लागणार नसून अवघ्या सात दिवसातचं नोंदणीच्या प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

या सुविधेचा लाभ कसा घ्यावा
पासपोर्ट सेवा एक्सलन्स व्हॅनद्वारे पासपोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला passportindia.gov.in वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. यानंतर, वेबसाइटवर अर्ज करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रक्रियेतून WAN पर्याय निवडावा लागेल. तपशील भरताच, फिंगरप्रिंट आणि फोटोसाठी तारीख निश्चित केली जाईल, व ही पासपोर्ट सेवा व्हॅन तुमच्या घराजवळ येईल.

या व्हॅनमध्ये दररोज 80 अर्ज भरले जाऊ शकतात. पासपोर्ट अधिकाऱ्यांच्यामते या व्हॅनमुळे एका महिन्यात तब्बल 9000 लोकं कोणतीही दगदग न करता पासपोर्ट काढू शकतात. घरातील ज्येष्ठ व लहान मुलांकरीता या व्हॅनची सुविधा घेता येऊ शकते.