पतंजलीचे ‘धना’सन, नफा 40 टक्क्यांनी वाढला; कोरोना काळात उत्पादनांची विक्री जोरात

849
baba-ramdev

लॉकडाऊनमध्ये एकीकडे देशातील अनेक व्यवसाय तोट्यात असताना योग गुरु बाबा रामदेवा यांच्या पतंजलीच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे. पतंजलीचा 2019-20 या आर्थिक वर्षात 40 टक्के नफा झाला आहे. तसचे कंपनीचा महसूल देखील 6 टक्क्यांनी वाढल आहे. सध्या कंपनीचा महसूल 9024 कोटी रुपये आहे.

ब्रिकवर्क्स रेटिंगमुसार पतंजली आयुर्वेदला या आर्थिक वर्षात 485 कोटींचा फायदा झाला आहे. लॉकडाऊनमध्ये आलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात व नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांच्या काळातही पतंजलीच्या नफ्याचा आकडा वाढतच होता. लॉकडाऊनमध्ये पतंजलीच्या प्रोडक्टची विक्री वाढली होती. लॉकडाऊनमध्ये कोरोना परिस्थितीमुळे हर्बल उत्पादनांच्या मागणीत वाढ झाली होती. त्याचाच फायदा पतंजलीला झाला आहे. पतंजलीच्या रोगप्रतिकारक क्षमता वाढविणाऱ्या औषधांना मोठी मागणी होती.

2019 च्या आर्थिक वर्षात पतंजलीचा टर्नओव्हर 8522.68 कोटी होता तर 2018 मध्ये 8135.94 टर्नओव्हर होता. पतंजलीने नुकतंच कोरोना इम्युनिटी बुस्टर चा दावा करत कोरोना किट लाँच केले आहे. या बुस्टरमुळे पतंजलीचा या आर्थिक वर्षातील नफा देखील वाढणार अशी चर्चा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या