
परराज्यातून गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना बेड्या ठोकत पाथर्डी पोलिसांनी 27 लाख 41 हजार 200 रुपयांचा गांजा जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी तुलसीदास दर्गादास खरगे व दिनेश सिलदार सोलंकी या मध्यप्रदेशातील आरोपींना अटक केली. या दोघांनी आणलेल्या बोलेरो पिकअप गाडीत सात गोण्यांमध्ये 60 किलो गांजा आढळून आला.
आज पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना एका खबऱ्याने परराज्यातील दोन आरोपी पांढरी पूल ते पाथर्डी रस्त्याने बोलेरो पिकअप वाहनातून गांजा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसाना देताच पोलिसांनी मिरी शिवारात सापळा रचून आरोपींची बोलेरो गाडी अडवत दोन्हीही आरोपींना ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी 20 लाख 41 हजार 200 रुपये किमतीचा 60.04 किलो गांजा, 7 लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप गाडी, असा एकूण 27 लाख 41 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईत पोलीस निरीक्षक विलास पुजारी , पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, संदिप ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, पोहेकॉ बाबासाहेब बडे, संभाजी कुसळकर, इजाज सय्यद, कानिफनाथ गोफने, म्हस्के, संजय जाधव, ज्ञानेश्वर इलग, सागर बुधवंत, भगवान टकले, अक्षय लबडे यांनी सहभाग घेतला.


























































