पवनहंस कंपनी अवघ्या 211 रोटी रुपयांनी विकली

केंद्र सरकारचा विक्री व्यवसाय जोरात सुरू असून एअर इंडियानंतर आता 30 वर्षांहून अधिक काळ हेलिकॉप्टर सेवा देणाऱ्या ‘पवनहंस या सार्वजनिक कंपनीची विक्री केली आहे. स्टार-9 मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीसोबत केवळ 211 कोटी के रुपयांमध्ये हा विक्री व्यवहार झाला आहे. पवनहंस वर्षानुवर्षे आर्थिक संकटाचा सामना करत असल्यानेच तिची विक्री केल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

पवनहंसवर 230 कोटी रुपयांचे कर्ज असून त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच कंपनीला 2018-2019 मध्ये 69 कोटी रुपयांचा तोटा झाला होता, तर 2019-2020मध्ये 28 कोटींचा तोटा सहन करावा लागला होता. तसेच हेलिकॉप्टरच्या सुमार मेंटेनन्समुळे अपघाताचे प्रमाण जास्त असल्याने कंपनीच्या आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पनवहंसमध्ये आपला असलेला 51 टक्के हिस्सा विक्रीसाठी काढला होता. त्याला 500 कोटी रुपयांची किंमत मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र सरकारने विक्रीदरम्यान किमान किंमत 199.91 कोटी रुपये ठेवली होती. त्यानुसार स्टार-9 मोबिलिटीने 211 कोटी रुपयांत सरकारचा हिस्सा खरेदी केला आहे. खरेदीदार कंपनीची सहा महिन्यांपूर्वीच स्थापना

पवनहंस कंपनी खरेदी करणाऱ्या स्टार-9 मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना सहा महिन्यांपूर्वी झाली असून 29 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईत नोंदणी झाली आहे. सरकारने ठेवलेल्या किमान किमतीच्या केवळ 11 कोटी रुपये जादा देत कंपनीने सरकारचा हिस्सा खरेदी केला आहे.

पनवहंसला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने एक विशेष योजना तयार केली होती. तसेच हेलिकॉप्टरची संख्या वाढवून सेवा सुधारण्याचा प्रयत्न होता, मात्र त्याला यश आले नाही. सध्या पवनहंस हेलिकॉप्टर सेवा देण्याबरोबरच ट्रेनिंग, स्किल डेव्हलपमेंट, बिझनेस डेव्हलपमेंट असे कार्यक्रम राबवत आहे.