
मुसलमानांच्या हॉटेलमध्ये मिळणारे ज्यूस हे नपुंसक बनवतात असं विधान माजी काँग्रेस नेत्याने केलं आहे. या विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.
या नेत्याचं नाव पीसी जॉर्ज असं आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, केरळमधील अनंतपुरी येथे झालेल्या एका हिंदू महासंमेलनात जॉर्ज यांनी हे वक्तव्य केलं याहे. ते म्हणाले की, मुसलमान व्यापारी हे देशातील पुरुष आणि महिलांना नपुंसक बनवून देशावर राज्य करण्याचं षडयंत्र रचत आहेत. त्यासाठी मुसलमान हे आपल्या हॉटेलातील ज्यूसमध्ये नपुंसक करणारी औषधं मिसळत आहेत, असं जॉर्ज यांचं म्हणणं आहे.
ते पुढे म्हणाले की, हिंदू आणि ख्रिश्चन महिला जास्त मुलं जन्माला घालत नाहीत. पण मुस्लीम महिला मात्र हे काम आनंदाने करतात. ते हिंदू राष्ट्रावर नियंत्रण मिळवण्याच्या हेतून हे सगळं करत आहेत. मी जेव्हा हिंदू लग्नांमध्ये जातो तेव्हा मी नववधूंना कमीतकमी चार मुलांना जन्म देण्यासाठी सांगतो. त्यातील काही जणी आनंदाने त्यासाठी तयार होतात, असं जॉर्ज म्हणाले आहेत.



























































