पीडीपीच्या युवा नेत्याला दहशतवाद प्रकरणात अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दहशतवादाशी निगडीत एका प्रकरणात पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचा (पीडीपी) युवा नेता वाहीद-उर-रहमान पारा यास बुधवारी दोन दिवसांच्या चौकशीनंतर अटक केली. एनआयएच्या अधिकाऱयांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

याअगोदर एनआयएने सोमवारी दिल्लीमध्ये पीडीपीचे युवा नेता वाहीद-उर-रहमान पारा याची दहशतवादाशी निगडित प्रकरणांसंबंधी चौकशी केली होती. निलंबित डीएसपी देविंदर सिंहशी निगडित असलेल्या दहशतवाद प्रकरणावरून वाहीदची चौकशी केली जात आहे. देविंदर सिंह यास कश्मीरमध्ये दहशतवाद्यांना आपल्यासोबत कारमध्ये घेऊन जात असताना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी डीसीपी देविंदर सिंह यांना निलंबित केल्यानंतर एनआयएने याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या