
पेणमध्ये भाजपला उतरती कळा लागली असुन भाजपच्या अनेक युवा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड यांनी त्यांना शिवबंधन बांधुन पक्षात स्वागत केले. तसेच शिवसेनेत सर्वांना सन्मानाची वागणूक दिली जाते असे आश्वासन देऊन युवा कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेच्या कामांना प्राधान्य देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कामाला लागा असा सल्ला दिला. शिवसेना सल्लागार किशोर जैन यांनी जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून काम करीत असताना त्यांच्या माध्यमातून जो 25 लाखाचा निधी आणला आहे. त्या निधीच्या माध्यमातून पेण शहरात गांधी मंदिरासमोर बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसविणे, नंदीमाळ नाका येथे शेड बांधणे व साईमंदिर येथे भक्तांसाठी पत्र्याची शेड बांधणे ही कामे आपण नगरपालिकेला सुचविली आहेत अशी सामाजिक कामे शिवसेना नेहमीच करते असेही ते म्हणाले.
यावेळी जितेश वर्तक, हर्षल पाटील, धीरज वर्तक, कुणाल मोकल, स्वप्निल म्हात्रे, सिद्धेश पाटील, चेतन पवार, रोहन पाटील, संकेत म्हात्रे, संदीप पटेल, रोहित गायकवाड, उमेश पाटील, आकाश चव्हाण, राकेश सांळुखे, प्रदीप गायकवाड यांच्यासह अनेक युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमास शिवसेना महिला जिल्हा संघटक दीपश्री पोटफोडे, विधानसभा संघटक बाळाशेठ म्हात्रे, शहरप्रमुख सुधाकर म्हात्रे, जिल्हा वाहतूक संघटक दिलीप पाटील, विधासभा अध्यक्ष चेतन मोकल, ग्राहक संरक्षण कक्षाचे नंदु मोकल, युवा सेना तालुका समन्वयक धीरज पाटील, तुकाराम म्हात्रे, लकी बोहरा, शाम शिंदे, गीता म्हात्रे, नटराज म्हात्रे, वंदना पाशिलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

































































