
पेण तालुक्यात आज नव्याने 3 कोरोना रुग्ण आले आहेत. तर यापूर्वी वडखळ येथील नऊ वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली होती, परंतु त्याचा सध्याचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र त्याची आजी त्याच्यासोबत सध्या मुंबईला रुग्णालयात असून त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
तालुक्यातील कामार्ली येथील दोन महिला कोरोना ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. या दोन मुली, त्यांचे वडील व भाऊ आईच्या अंत्यविधीसाठी ठाणे येथे गेले होते. त्यातूनच त्यांना लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर कुटुंब ठाण्यावरून कामार्ली येथे आले असता प्रशासनाने त्यांना क्वारंटाईन केले होते. तसेच त्यांना अधिक उपचारार्थ अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आले आहे.


























































