पेण तालुक्यात 5 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले, एकूण आकडा 11 वर

2355

पेण तालुक्यात एकाच वेळी 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आता तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांनी दुहेरी आकडा गाठला आहे. गुरुवार पर्यंत पेण तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण सापडले होते. मात्र आज एकाच वेळी 5 रुग्ण आढळल्याने आता तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 11 वर जाऊन पोहोचला आहे.

पेण शहरातील कारमेल हायस्कूल जवळील एका सोसायटी मध्ये एक 28 वर्षीय महिला रुग्ण तसेच तालुक्यातील चोळे या गावी 2 महिला 1 पुरुष व एक 13 वर्षाचा मुलगा असे एकूण 5 पँझिटिव्ह रुग्ण आज आढळले आहेत. हे सर्व रुग्ण मुंबई वरून पेण तालुक्यात आले होते. दरम्यान पेण नगरपरिषदेने कारमेल शाळेजवळील त्या सोसायटीमध्ये सँनीटायझेशन केले आहे.  या 5 रुग्णांपैकी एका रुग्णाला पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 4 रुग्णांना पनवेल येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. शहरात देखील दुसरा रुग्ण आढळल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या