रिलायन्स गॅस पाईप लाईन विरोधातील उपोषण मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पेण

रिलायन्स गॅस पाईप लाईन कंपनीकडून अल्पदरात शेतजमिनीचा मोबदला देऊन दडपशाहीने जमीन संपादित केल्याचा आरोप करत बुधवारी पेण मधील शेकडो शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले. या उपोषणाची दखल घेत उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी येत्या 7 तारखेला चर्चेतून अंतिम मार्ग काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपले उपोषण तूर्तास मागे घेतले केले आहे.

जीरणे येथे 26 डिसेंबर 2016 रोजी झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये रिलायन्स कंपनीचे अधिकारी हितेन रॉय यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्याच्या रकमेपेक्षा अधिक मोबदला दुसऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीने दिला तर ती फरकाची रक्कम कंपनी अदा करेल असे पत्र शेतकऱ्यांना दिले होते. कंपनीने जाहीर केलेला दर प्रतिगुंठा 80 हजार असला तरी येथील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे वाढीव भाव देण्यात आला आहे आणि तशा प्रकारचे पुरावे शेतकऱ्यांनी गोळा करून कंपनीने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे विष्णु पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पेण येथील उपविभागीग कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले . पण प्रांताधिका संयुक्त बैठक घेतली. त्यानंतर कंपनीने पुढील दोन दिवसात चर्चेला बसायचे लेखी पत्राद्वारे मान्य केल्यानंतर हे साखळी उपोषण तूर्तास स्थगित करण्याचे ठरले.