गोव्यात बेकायदा आडनावे बदलणार्‍यांना होणार शिक्षा, सरकार करणार कायदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता आडनावे बदलणार्‍या व्यक्तींना शिक्षा देण्यासाठी कायदा करण्याचे गोव्यातील भाजप सरकारने ठरविले आहे.

गोव्याचे विधीमंत्री नीलेश काब्राल यांनी राज्य विधानसभेत ‘गोवा चेंज ऑफ नेम आणि सरनेम’ विधेयक शुक्रवारी सादर केले. या विधेयकानुसार योग्य प्रक्रिया पार न पाडता आडनाव बदलण्याचा गुन्हा करणार्‍यास तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाणार आहे. अनेक बिगर गोवावासीयांनी आपली आडनावे राखीव जागांचा लाभ घेण्यासाठी बदलली आहेत. याप्रकरणी काही संस्थांनी सरकारकडे तक्रार दाखल केली होती. केवळ गोव्यात जन्मलेली व्यक्ती आपल्या नावात बदल करू शकेल, असे काब्राल यांनी सांगितले. गोव्यात स्थलांतरित झालेल्या अनेक लोकांनी बेकायदेशीरपणे स्थानिक आडनावे वापरली आहेत. मात्र, विधानसभेचे अधिवेशन शुक्रवारी स्थगित झाल्याने हे विधेयक मंजूर झाले नाही.