
सामना प्रतिनिधी । आष्टी
ग्रामपंचायत कार्यालयाच्या कमानीस गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील धामणगाव येथे गुरूवारी पाहटे साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली. मृत तरुणाचे नाव सतीश होळकर असून त्याचे वय ३४ वर्षे होते. धामणगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय दुसर्या मजल्यावर आहे. या कार्यालयाच्या गॅलरीमधून सतीश यांनी गळ्याला फास लावून खाली उडी मारली आणि आपली जीवन यात्रा संपवली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच धामणगाव ग्रामंपचायत परिसरात नागरीकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. सतीश यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.


























































