कर्जबारीपणाला कंटाळून पित्याची पुत्रासह आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना प्रतिनिधी । सोनई

नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील तरुण बाबासाहेब पोपट आलवणे (वय ३५) याने कर्जबाजारीपणाला कंटाळून मुलगा संकेतसह मुळा उजवा कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली. बाबासाहेब याचा मृतदेह गुरूवारी सकाळी १० वाजता कौठा शिवारात पाण्यात तरंगताना आढळला. तर मुलगा संकेत याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी ८ वाजता रस्तापुर शिवारात पाण्यावर तरंगताना आढळला.

याबाबत मृत बाबासाहेब आलवणे यांचे मेव्हणे सुधाकर अंबादास होंडे यांनी शनिशिंगणापूर पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. होंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार बाबासाहेब आलवणे यांनी होंडे यांना फोन करून कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते. दोघांच्या मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. याप्रकरणी सोनई व शनीशिंगणापूर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.