दारू पिताना बसायला जागा नाही दिली म्हणून केला खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नवी दिल्लीमध्ये एका क्षुल्लक कारणावरून एका इसमाने त्याच्याच सहकर्मचार्‍याचा खून केला आहे. दारू पिताना बसायला जागा दिली नाही म्हणून एका व्यक्तीने डोक्यात झाडू मारून मारून त्याचा खून केला. मृत व्यक्तीचे नाव संजय कुमार असून आरोपीचे नाव सुधीर बंटी आहे.

संजय कुमार आणि सुधीर बंटी दिल्लीच्या महानगरपालिकेतील स्वच्छता विभागात कार्यरत होते. दोघे एका दारुच्या गुत्त्यावर दारू प्यायला गेले होते. तिथे संजय कुमारचा मित्रही आला होता. दोघे एकाच टेबलवर बसून दारू पित होते. सुधीर बंटीने संजय कुमारला बसायला जागा देण्यास सांगितले. संजय कुमारने त्याला नकार दिला. या क्षुल्लक गोष्टींवरून दोघांमध्ये वाद झाला आणि सुधीर बंटीने शेजारी पडलेल्या झाडूने संजयच्या डोक्यात वार केले. संजय बेशुद्ध पडला आणि सुधीर तेथून निघून गेला.

संजय कुमारच्या मित्राने त्याला जवळच्या इस्पितळात दाखल केले तर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी सुधीर बंटीवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून्त त्याला अटक केली आहे.