बेरोजगारीवरून टोमणे, संतापलेल्या दिराकडून वहिनीसह पुतण्याची हत्या

1157

बेरोजगार असल्याने वहिनी सारखी दीरला टोमणे मारत होती. सततच्या टोमण्यांमुळे संतापलेल्या दिराने आपली वहिनी आणि पुतण्याचा खून केला आहे. कामोठ्यात ही घटना घडली असून आरोपीचे नाव सुरेश चव्हाण असे आहे.

कामोठ्यात योगेश चव्हाण त्यांची बायको जयश्री चव्हाण, मुलगा अविनाश आणि भाऊ सुरेश आणि आई-वडील असे कुटुंब राहत होते. योगेश एका कंपनीत सुरक्षा रक्षकाचे काम करत होता. सुरेश आधी एका फुड डीलिव्हरी कंपनीत कामाला होता. परंतु नंतर त्याला कामारून काढून टाकले होते. नंतर अनेक दिवस सुरेश घरीच होता. काम करत नसल्याने सुरेशचे आई वडील आणि वहिनी त्याला ओरडायचे. वहिनी जयश्री त्याला बेरोजगार असल्यावरून टोमणे मारत होती. काही महिन्यांपूर्वी कुटुंबीयांनी त्याला घरातूनही हाकलून लावले होते. नंतर एक पार्ट टाईम नोकरी मिळाल्याने तो घरी परतला होता.

गणपतीसाठी आई-वडील गावी गेले होते. एके दिवशी नेहमीप्रमाणे योगेश कामाला निघाले. तेव्हा सुरेश घरी होता. सुरेश आणि जयश्रीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. तेव्हा सुरेशने दोघांचा तोंडावर उशी दाबून खून केला. दुसर्‍या दिवशी योगेश घरी आला. अनेकवेळा दार ठोठावूनही जयश्रीने दार उघडले नाही. शेवटी योगेशने पोलिसांना पाचारणे केले. पोलिसांनी दार तोडल्यानंतर समोर जयश्री आणि तिचा मुलगा मृतावस्थेत आढळले. आरोपी सुरेशही तिथेच उपस्थित होता.

पोलिसांनी तातडीने सुरेशला अटक केली. वहिनी सारखी नोकरीवरून टोमणे मारत होती म्हणून आपणे हे कृत्य केल्याचे सुरेशने कबुल केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या