
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
वर्गशिक्षिकेच्या पतीने घरगुती क्लासमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना काल संध्याकाळी घडली. याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांनी आज सकाळी १० वाजता शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता आरोपीला अटक करण्यात आली आहे.
महात्मा फुले विद्यालयातील शिक्षिका ही घरी शिकवणी वर्ग घेत असताना भारत विद्यालयातील ५ व्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थिनीचा आरोपी अनिल चव्हाण याने विनयभंग केला. श्रेयस कोचिंग क्लासेस, मच्छी ले-आऊट येथे घरात शिकवणी वर्ग चालतात. या ठिकाणी विनयभंगाचा गुन्हा घडला असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.




























































