व्हिडीओ व्हायरलची धमकी देत मागत होता खंडणी, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

669

इंस्टाग्रामवर तरुणीला खासगी व्हिडीओचे क्रीन शॉट पाठवून खंडणी मागणाऱ्याच्या युनिट 11 ने मुसक्या आवळल्या. क्यूमेल मोहम्मद हनीफ पटणी असे त्याचे नाव आहे. त्याला पुढील तपासाकरिता बांगूरनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

इंस्टाग्रामवर एका तरुणीला वेगवेगळ्या अकाऊंटवरून खंडणीसाठी मेसेज येत असल्याप्रकरणी बांगूरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या पथकातील शरद झिने विशाल पाटील यांनी तपास सुरु केला, गुन्हे शाखेतील सहायक निरीक्षक विठल चौगुले यांनी त्या अकाउंट्सचे विश्लेषण केले. कौशल्याचा वापर करून पोलिसांनी क्यूमेलला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडील एक मोबाईल फोन जप्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या