आता पाळीव प्राण्यांसाठी मालकांना भरावा लागणार टॅक्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्यांच्या घरात कुत्रा मांजर असे पाळीव प्राणी आहेत त्यांना आता भविष्यात टॅक्स भरावा लागू शकतो. मध्यप्रदेश मधील सागर शहराच्या महानगर पालिकेने अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. या शहरात आता पाळीव प्राणी पळण लोकांना महाग पडणार आहे. कारण ही महानगर पालिका पाळीव प्राण्यांसाठी मालकानं कडून टॅक्स वसूल करणार आहे.

सागर महानगर पालिकेतील नगरसेवकांची रविवारी महत्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीत सर्व नगरसेवकांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्रा मांजरी सारखेच पाळीव प्राणी पण रस्त्यावर घाण करत असतात. त्यामुळे शहर अस्वच्छ होते. तसेच पाळीव प्राणी देखील लोकांना चावल्याच्या घटना ऐकण्यात आल्या आहेत. त्यामुळे महानगर पालिकेने पाळीव प्राण्यांच्या मालकांकडून टॅक्स घेण्याचा निर्णय घेतला आहे.

महानगर पालिकेतील सर्व 40 नगरसेवकांनी सर्वानुमते हा निर्णय घेतला आहे. लवकरच या बाबत कायदा करण्यात येणार असून एप्रिल महिन्यापासून पाळीव प्राण्यां साठी टॅक्स द्यावा लागू शकतो.

प्राण्यांचे होणार लसीकरण
महानगर पालिका प्राण्यांसाठी घेणार असलेल्या टॅक्स मध्ये शहराची स्वच्छता आणि प्राण्यांचे लसीकरण या दोन गोष्टी केल्या जाणार आहेत.