
कोविशिल्ड लस तयार करणाऱया पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांना धमकावणाऱयांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात यावा तसेच या प्रकरणाची चौकशी करून पुनावाला यांच्या कुटुंबियांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर लवकरच सूनवणीची शक्यता आहे.
अदर पुनावाला यांना लसीसाठी अनेक बडय़ा व्यक्तींचे धमक्यांचे फोन आले असून त्यांनी याबाबत युकेतील एका इंग्रजी वृत्तपत्राला मूलाखत दिली आहे. अदर पुनावाला हे सध्या आपल्या कुटुंबियांसोबत ब्रिटन मध्ये रहात आहेत. त्यामुळे पुनावाला यांना धमकावणाऱया लोकांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ऍड. दत्ता माने यांनी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.































































