मुख्यमंत्र्यांविरोधात ‘ईडी’मध्ये याचिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
devendra-fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात ‘ईडी’मध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. पोलीस तसेच अन्य सरकारी योजनांचे पैसे ऑक्सिस बँकेतून दिल्याप्रकरणी ही याचिका अंमलबजावणी संचालनालयाकडे दाखल करण्यात आली आहे. एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने ही तक्रार केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली पत्नी ज्या बँकेत सेवेत आहेत त्या बँकेला झुकते माप देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. ऑक्सिस बँकेची निवड प्रचलित नियमांनुसारच करण्यात  आल्याचा खुलासा  मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे.