ब्रेक के बाद… पुन्हा एकादा पेट्रोल-डिझेलची दरवाढ, सामान्यांच्या खिशाला महागाईची झळ

दोन दिवसांच्या ब्रेकनंतर मंगळवारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढवले आहेत. आज दिल्लीत पेट्रोल 35 पैसे प्रति लीटर वाढून 90.93 रुपयांवर पोहोचले आहे. डिझल देखील 35 पैसे प्रति लीटरने वाढले आहे. देशाच्या अनेक शहरांमध्ये प्रीमियम पेट्रोल 100 रुपयांच्यावर पोहोचले आहे.

सोमवारी क्रूड 65 डॉलर प्रति बॅरलचा आकडा पार करून गेला. तेलाचे दर देशात विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत. प्रीमियम पेट्रोल तर आधीच 100 रुपयांच्या पार झाले आहे. आता सामान्य पेट्रोल देखील राजस्थानच्या श्रीगंगानगर, मध्य प्रदेशच्या अनूपपुर सारख्या शहरांमध्ये 100 रुपयांपर्यंत विकले जात आहे.

प्रमुख शहरातील दर

या वाढीनंतर आता दिल्लीत पेट्रोल 90.93 रुपये आणि डिझेल 81.32 रुपये लिटर झाले आहे. तर मुंबईत पेट्रोल 97.34 रुपये आणि डिझेल 88.44 रुपये लिटर, कोलकातामध्ये पेट्रोल 91.12 रुपये आणि डिझेल 84.19 रुपये लिटर तसेच चेन्नईत पेट्रोल 92.90 रुपये आणि डिझेल 86.31 रुपये लिटर झाले आहे. भोपाळमध्ये पेट्रोल 98.96 रुपये और डिझेल 89.60 रुपये लीटर इतके आहे.

डिझेलचे दरही ऐतिहासिक स्तरावर

पेट्रोलच्या सोबत डिझेलचे दर देखील गगनाला भिडले आहेत. आज डिझेल 35 पैसे महाग झाले आहे. या महिन्यात 13 दिवसात त्याची किंमत 3.84 रुपयाने वाढली आहे. तर नव्या वर्षात अवघ्या दीड महिन्यात डिझेल 07.45 रुपये प्रति लिटर महागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या