डुडूळगावात नळाद्वारे अचानक पेट्रोल यायला लागलं ?

22
फोटो प्रतिकात्मक

सामना ऑनलाईन, आळंदी

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींच्या बातम्या वाचणाऱ्या डुडुळगावातील रहिवाशांच्या घरातील नळातून अचानक पेट्रोल यायला लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. बोअरिंगच्या नळातून हे पेट्रोलमिश्रित पाणी यायला लागल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. मोशी-आळंदी रस्त्यावरील डुडुळगावातील तळेकर नगरमध्ये हा प्रकार घडला असून तो कसा घडला याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. काहींचं म्हणणं असं आहे की पेट्रोल जमा करून ठेवण्याच्या टाकीला गळती लागली असावी आणि हे पेट्रोल बोअरिंगच्या पाण्यात मिसळलं असावं.

पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज नवा उच्चांक प्रस्थापित करीत आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल ८७.७७ रूपये लिटर दराने विकलं जात आहे. दरवाढ अशीच सुरू राहिली तर लवकरच पेट्रोलचे दर नव्वदी आणि वर्षाखेरपर्यंत शंभरी गाठतील अशी भीती वाटायला लागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या