
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पेट्रोल आज १० पैशांनी स्वस्त झाले. मात्र, डिझेलची किंमत कमी झाली नाही. गेल्या पाच दिवसांत पेट्रोल ३४ पैशाने स्वस्त झाले असले तरी चार प्रमुख महानगरांमध्ये मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर हे चढेच आहेत. मुंबईत पेट्रोल सध्या ८५.९२ पैसे तर डिझेल ७३.५८ पैशांनी मिळते. १४ ते २८ मेपर्यंत पेट्रोलच्या दरात सलग १६ दिवस वाढ होत राहिली होती. त्यामुळे पेट्रोलच्या दरात ४ रुपये तर डिझेलच्या दरात ३.६२ रुपये वाढ झाली होती.


























































