यूपीआय पेमेंट बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन हजार रुपयांहून अधिक रकमेच्या ‘पर्सन-टू-मर्चंट’ (पीटूएम) यूपीआय व्यवहारांवर सुधारित व्यापारी सवलत दर (एमडीआर) लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात असंतोष वाढत चालला आहे. मुंबईच्या पेट्रोल डीलर्स असोसिएशनने रिझर्व्ह बँक व अर्थ मंत्रालयाला पत्र लिहिले असून पेट्रोल पंपांना संपूर्ण सूट देण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने सूट न दिल्यास 15 ऑक्टोबरपासून यूपीआय पेमेंट स्वीकारणे बंद केले जाईल, असा इशारा मुंबईतील पेट्रोल पंप चालकांनी दिला आहे.