
कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आरोग्य आणिबाणी जाहीर केली आहे. चीनमध्ये आतापर्यंत 340 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोरोना व्हायरस आता चीनबाहेरही फोफावत चालला आहे. फिलिपिन्स देशातही या व्हायरसमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. चीन बाहेर कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होण्याची ही पहिली घटना आहे. मात्र मृत्यू झालेली व्यक्तीही फिलिपिन्सची रहिवासी नसून ती चीनमधीलच असल्याचे समोर आले आहें.
वुहान हे कोरोना व्हयरसचे केंद्रबिंदू असून, तेथूनच तो व्हायरस पसरण्यास सुरवात झाली होती. चीन मध्ये आता पर्यत 340 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून, ती संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवार पर्यंत जवळ जवळ 14300 लोकांना याची लागण झाली असल्याचे चीनच्या आरोग्य खात्याने सांगितले.




























































