Photo – निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेत जोरदार इनकमिंग, पक्षप्रवेशाचा धडाका

कांदिवली पूर्व प्रभाग क्रमांक 28 मधील हनुमान नगर येथील शिंदेगटाच्या महिला शाखासंघटक अश्विनी पवार, उपशाखाप्रमुख भरत पाटील, उपशाखाप्रमुख विनोद गुजर, उपशाखाप्रमुख विजय यादव, उपशाखाप्रमुख गणेश खंदारे, उपशाखाप्रमुख महेश शर्मा, उपशाखाप्रमुख सुधाकर पाटील यांनी आज मातोश्री येथे शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी विभागप्रमुख संतोष राणे, उपविभागप्रमुख प्रशांत कोकणे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

गोरेगाव वॉर्ड क्रमांक 50 मधील काँग्रेसचे मुंबई जनरल सेक्रेटरी अनिल शर्मा आणि टीना शर्मा यांनी आज मातोश्री येथे शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून स्वागत केले. यावेळी शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, विभागप्रमुख संतोष राणे, गोरेगाव विधानसभा संघटक राजू पाध्ये, मालाड विधानसभाप्रमुख कैलास कणसे, उपविभागप्रमुख दिनेश राव उपस्थित होते.

खडकवासला येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाचे शहर उपाध्यक्ष राहुल बाबासाहेब घुले पाटील यांनी आज मातोश्री येथे शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून स्वागत केले. यावेळी शहरप्रमुख गजानन थरकुडे, प्रभागातील उमेदवार शिवाजी मते, सोनाली पोकळे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.