Photo – ‘बोईंग 737’ विमानाला उडती शवपेटी का म्हणतात?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनमध्ये सोमवारी भीषण विमान दुर्घटना घडली आहे. 9 क्रू मेंबर्स व 123 प्रवाशांना घेऊन चाललेले ‘बोईंग 737’ विमान अवघ्या दोन मिनिटांत तब्बल 30 हजार फूट खाली येत गुआंग्शी परिसरातील डोंगराळ भागात आदळले. यात सर्वच्या सर्व 132 प्रवासी ठार झाल्याची भीती आहे.

‘बोईंग 737’ या विमानांचे अनेकदा अपघात झाले असले तरी ही सर्वाधिक विकली जाणारी विमाने आहेत. ‘बोईंग 737’ विमानाने 9 एप्रिल 1967 ला पहिल्यांदा उड्डान घेतले होते आणि फेब्रुवारी 1968 पासून याचा व्यावसायिक वापर सुरू झाला होता. ‘बोईंग’च्या वेबसाईटनुसार सध्या ‘बोईंग 737’ सीरिजचे 4172 विमाने सक्रिय आहेत.

चीनमध्ये विमान अपघातामध्ये जे ‘बोईंग 737’ कोसळले ते तिसऱ्या पिढीचे विमान आहे. 1997 मध्ये याची निर्मिती करण्यात आली होती. या सीरिजमधील अखेरची दोन विमाने चायना इस्टर्न एअरलाईनस्लला जानेवारी 2020 मध्ये सोपवण्यात आली होती.

‘बोईंग 737-800’ मधील 1.25 कोटी उड्डाणांतील एखादे विमान अपघातग्रस्त होते. त्यामुळे जगातील सर्वाधिक सुरक्षित विमानांमध्ये याचा समावेश होतो. परंतु आतापर्यंत ‘बोईंग 737’ चे 83 दुर्घटना झाल्या असून यात शेकडो लोकांनी प्राण गमावल्याचे AirSafe.com या वेबसाईटने म्हटले आहे.

‘बोईंग 737’ चा याआधीचा अपघात जानेवारी 2021 मध्ये झाला होता. इंडोनेशियाचे विमान SJ182 कोसळले होते आणि या अफघातामध्ये विमानातील 62 लोकांचा मृत्यू झाला होता. हिंदुस्थानमध्येही केरळ कोझिकोड विमानतळावर दीड वर्षांपूर्वी ‘बोईंग 737-800’चा अपघात झाला होता आणि यात 20 लोकांचा मृत्यू झाला होता.