
छोट्या पडद्यावरील ग्लॅमरस अभिनेत्री जेनिफर विंगेट ही आपल्या लूक्स आणि अभिनयामुळे प्रेक्षकांची अत्यंत लाडकी ठरली आहे. कसौटी जिंदगी की पासून तिच्या लोकप्रियतेला सुरुवात झाली. त्यानंतर बेहद, बेपनाह, सरस्वतीचंद्र अशा विविध मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत झाली. नुकतंच तिने हॉट फोटोशूट केलं. ते व्हायरल झालं असून त्याच्यावर चाहत्यांच्या कमेंट आल्या आहेत.






























































