1 / 6
जगभरात मधुमहाचे प्रमाण वाढत आहे. उतारवयात होणारा हा विकार लहान मुलांमध्येही वाढीस लागत आहे. हे टाळण्यासाठी मुलांना सकस, पोषक आहार देऊन त्यांना काही पदार्थांपासून दूर ठेवणे गरजेचे आहे.
लहान मुलांना ब्रेड देणे टाळले पाहिजे. ब्रेडचे पचन झाल्यानंतर त्याचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होते. त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. तसेच ब्रेडमुळे लठ्ठपणाही वाढतो. लठ्ठपणा वाढल्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.
जंक फूडमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे अशा पदार्थांनी शरीरात अतिरिक्त कॅलरीज जमा होतात. त्यामुळे लठ्ठपणा वाढणे, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते.
मुलांना जेवणात सकस पदार्थ द्यावेत. मात्र, स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी करण्याची गरज आहे. जास्त प्रमाणात स्निग्ध पदार्थांमुळे लठ्ठपणा वाढण्याची भीती असते.

































































