Photo – अप्सरा आली…. तुर्कीत साडी नेसून सोनालीचं हटके फोटोशूट

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्याने सगळ्यांना भुरळ पाडते. सध्या ती तुर्कस्थान येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दरम्यान, तिने तुर्कस्थानमध्ये साडी नेसून एक फोटोशूट केलं आहे. कॅप्पाडोसिया नावाच्या एका प्रसिद्ध ठिकाणी तिने हे फोटोशूट केलं आहे. या फोटोशूट प्रकाराला क्रॉस कल्चर असं म्हटलं जातं. म्हणजे एका वेगळ्या संस्कृतीच्या ठिकाणी दुसऱ्याच संस्कृतीचे पेहराव करून फोटो काढणं होय. सोनालीनेही तुर्कस्थानच्या पार्श्वभूमीवर साडी नेसून हे सुंदर फोटोशूट केलं आहे.