‘दबंग गर्ल’ सईचे फोटो व्हायरल!

1153

अभिनेता सलमान खान याला बॉलीवूडचा गॉडफादर म्हटले जाते. सलमानने बऱ्याच नवोदित अभिनेत्रींना आपल्या सिनेमातून लाँच केले आहे. या यादीत आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीची भर पडणार आहे. मराठी इंडस्ट्रीचे ‘बिग बॉस’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची कन्या सई मांजरेकर आता सलमानच्या ‘दबंग 3’ मधून पदार्पण करीत आहे. सई एंट्रीलाच सलमानची नायिका बनणार आहे. खुद्द सईनेच आज सोशल मीडियावर ‘दबंग 3’ मधील लूकचे काही फोटो शेअर करून ही खूशखबर दिली.

सलमानच्या ‘दबंग 3’ सिनेमाची सध्या चर्चा सुरू आहे. सलमानच्या चाहत्यांमध्ये सिनेमाबाबत कमालीची उत्सुकता आहे. ‘दबंग 3’ चे फोटो लीक होऊ नयेत यासाठी खूप खबरदारी घेतली जात होती. अगदी सेटवर मोबाईल नेण्यासही बंदी होती. त्यानंतर आज सईने एकामागून एक ट्विटरवर ‘दबंग 3’चे फोटो शेअर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ट्विटरवरील फोटोत सई अतिशय गोड दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहेत. ‘दबंग 3’ मधील सई आणि सलमानच्या दृश्यांचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. सई सध्या एका गाण्याच्या शूटिंगच्या तयारीत आहे. ‘दबंग 3’ च्या माध्यमातून दाक्षिणात्य सुपरस्टार सुदीप बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. सिनेमात तो खलनायकाच्या भूमिकेत आहे. सिनेमाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करीत असून सोनाक्षी सिन्हादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. हा सिनेमा 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल.

आपली प्रतिक्रिया द्या