
मुंबईच्या मध्यमगती गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू सायली सातघरे हिची टीम इंडियाच्या महिला कसोटी संघात निवड झाली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून सायलीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

सामना सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंच्या हस्ते सायलीला कसोटी पदार्पणाची मानाची टोपी प्रदान करण्यात आली.

लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये (कसोटी क्रिकेट) तिची अचूक गोलंदाजी भारतीय संघासाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सायलीसोबत प्रतिका रावल, काश्वी गौतम, क्रांती गौड यांनी देखील कसोटी संघात पदार्पण केले आहे.



























































