
बिग बॉस मराठीच्या घरात एकमेकांचे अगदी खास मित्र असलेले विशाल निकम व विकास पाटील यांनी फिनालेनंतर दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचे दर्शन घेतले आहे. ज्योतिबानंतर हे दोघे महालक्ष्मीच्या दर्शनाला देखील गेले होते. 
बिग बॉसच्या घरात विशाल व विकासच्या यांना घरातील जय विरू बोलले जायचे. विशाल कॅप्टन बनावा म्हणून विकासने टक्कल केले होते. विकासने टक्कल केलेले पाहून विशालने देखील त्याचे केस कापले होते. 
विकास व विशाल हे दोघेही बिग बॉसच्या फिनालेमध्ये आले होते. विकास हा अंतिम तीन पर्यंत पोहोचला होता. मात्र जय व विशाल हे अखेरच्या दोघांत पोहोचले.



























































