
आपल्या युजरसाठी व्हॉट्सअॅप सतत नवनवीन फीचर आणत असते. आता लवकरच व्हॉट्सअॅपवर एक भन्नाट फीचर येणार आहे. या फीचरच्या मदतीने युजरने शेअर केलेला फोटो किंवा व्हिडिओ अन्य युजरला केवळ एकदाच पाहता येईल. व्ह्यू वन्स असे या फीचरचे नाव आहे. हे फीचर इन्स्टाग्रामच्या एक्सपायरिंग मीडिया फीचरप्रमाणे काम करते.
- WABetainfoच्या माहितीनुसार आधी हे फीचर अँड्रॉईड युजर्सना मिळेल. यासाठी युजरला 2.21.14.3 हे बिटा व्हर्जन अपडेट करावे लागणार आहे.
- गॅलरीतील फोटो किंवा व्हिडिओ सिलेक्ट केल्यावर युजरला घडय़ाळाचे चिन्ह दिसेल. त्यावर टॅप केल्यानंतर समोरचा युजर शेअर केलेला फोटो किंवा व्हिडिओ एकदाच पाहू शकतो. माहितीनुसार एखाद्या युजरने रीड रिसिप्ट ऑप्शन डिसेबल केले असेल तरीदेखील व्ह्यू वन्स हे फीचर काम करणार आहे.

























































