विमान हवेत असताना पायलटची प्रशिक्षणार्थी महिलेसोबत गंमत जंमत, व्हिडीओ व्हायरलमुळे दोघांवरही कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमान प्रवासादरम्यान पायलट कॉकपिटमध्ये प्रशिक्षणार्थी महिलेसोबत रोमान्स करतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ही घटना रशियाची आहे. एका 28 वर्षीय विवाहित वैमानिकाने एका 21 वर्षीय महिला प्रशिक्षणार्थीला रोमान्स करण्यासाठी अतिरिक्त फ्लाइंग क्लास ऑफर केला. तिने देखील या क्लासला होकार दिला. त्यानंतर विमान हवेत असताना दोघांनी विमानाच्या कॉकपिटमध्ये रोमान्स सुरू केला. यावेळी दोघांनीही त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. मात्र नंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला.

विमानाला ऑटोपायलट मोडमध्ये ठेवून पायलट आणि प्रशिक्षणार्थी महिला रोमान्स करत असल्याचा व्हिडिओ सासोवो फ्लाइट स्कूलच्या बॉसपर्यंत पोहोचला. ते दोघे सेसना 172 विमानाच्या कॉकपिटमध्ये होते. सासोवो स्कूलच्या कर्मचाऱ्यांनी या पायलटला ओळखले. त्यानंतर फ्लाइट इन्स्ट्रक्टर आणि त्याच्या सोबतच्या महिलेची संस्थेतून हकालपट्टी करण्यात आली.

याबाबत प्रशिक्षणार्थी महिलेची चौकशी केली असता तिने सांगितले की विमानाचा ऑटोपायलट मोड चालू होता. त्यावेळी आम्ही फक्त किस केले आणि मिठी मारली. ही पहिलीच वेळ असून मी यापुढे असे कधीही करणार नाही. महिला प्रशिक्षणार्थीचा बदला घेण्यासाठी तिच्या सहकारी कॅडेटनेच ही व्हिडिओ ऑनलाइन शेअर केल्याचे काही दिवसांनी उघडकीस आले.