पिंपळ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

सामना ऑनलाईन । मुंबई
गजेंद्र आहिरे दिग्दर्शित पिंपळ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. दिलीप प्रभावळकर, प्रिया बापट, अलोक राजवडे या कलाकारांची या सिमेमात मुख्य भूमिका आहे. ‘पिंपळ’ . आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणाऱ्या वृद्ध व्यक्तीची कथा आहे. ‘जनरेशन गॅप’ च्या समस्येवर हा चित्रपट अधारित असल्याचे ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे. येत्या ८ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.