पीयूष गोयल यांच्या घरी चोरी; नोकराला दिल्लीतून अटक

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या नेपियन्सी रोडवरील येथील घरातून मौल्यवान वस्तू आणि हार्डडिस्क चोरणाऱया नोकराला गावदेवी पोलिसांनी बुधवारी दिल्लीतून अटक केली. विष्णूकुमार विश्वकर्मा असे नोकराचे नाव आहे.

गोयल यांच्या घरातून 16 सप्टेंबर रोजी चांदीची भांडी, धातूच्या वस्तू, महागडे कपडे चोरीला गेले होते. 19 सप्टेंबरला त्यांच्या पत्नीच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी विष्णूकुमार याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांना काही पैसे आणि हार्ड डिस्क सापडली आहे. त्यातील काही डेटा त्याने इतरांना ई-मेलवरून पाठवल्याचे उघड झाले आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये रेल्वे आणि अर्थमंत्रालयाशी निगडित माहिती सापडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या