
पृथ्वी हा एक असा ग्रह आहे जिथे दरवर्षी सूर्यग्रहण व चंद्रग्रहण होत असते. ही अशी ग्रहणं म्हणजे खगोलतज्ञ व खगोलप्रेमींसाठी पर्वणीच असतात. मात्र फक्त पृथ्वीवरच नाही तर सौरमालेतील ग्रहांपैकी 6 ग्रहांवर देखील ग्रहण पाहायला मिळते. जाणून घेऊया या ग्रहाविषयी तसेच तेथील ग्रहणाविषयी…

मंगळ ग्रहावरील सूर्यग्रहण हे एका छोट्याशा डागाप्रमाणे दिसते. कारण मंगळ ग्रहाचे फोबोस आणि डिमोस हे असे दोन चंद्र आहेत जे वेगाने मंगळाभोवती फेऱ्या मारत असतात त्यामुळे चंद्रामुळे निर्माण होणारे ग्रहण देखील फार काळ राहत नाही.

गुरू या ग्रहावर तीन सूर्यग्रहणं एकत्र होतात. या ग्रहांचे एकूण 67 चंद्र आहेत. पण या पैकी पाच असे चंद्र आहेत जे ग्रहणाची परिस्थिती निर्माण करतात. यातील तीन चंद्र पृथ्वी आणि गुरूच्या मध्ये येऊन सूर्यग्रहणाची परिस्थिती निर्माण करतात. मात्र हे ग्रहण 10 वर्षांतून एकदाच होते.

शनी ग्रहाजवळ एकूण 62 मोठे चंद्र आहेत व ते एकत्र येऊन सूर्यग्रहणाची परिस्थिती निर्माण होते. शनी ग्रहावर 15 वर्षांतून एकदाच सूर्यग्रहण होते. शनीवर शेवटचे सूर्यग्रहण 15 सप्टेंबर 2006 ला झाले होते.

युरेनस या ग्रहावर 27 चंद्र आहेत. पण यातले काही चंद्र हे आकाराने लहान आहेत. तसेच त्यांच्यात जास्त अंतर असल्या कारणाने तेथे सूर्यग्रहण 42 वर्षातून एकदाच होते व ते देखील सूर्यावर एक छोटा काळा डाग असल्याप्रमाणे दिसते.

नेपच्यून वरील सूर्यग्रहण काही सेकंदातच संपते. नेपच्यूनच्या जवळपास 6 चंद्र आहेत. पण नेपच्यून आणि त्या सूर्यांमध्ये जास्त अंतर असल्याने सूर्यग्रहण कमी होते आणि झाले तरी ते काही सेकंदातच संपते.

प्लूटो हा ग्रह छोटा असला तरी तेथून सुद्धा सूर्यग्रहण दिसते. हे सूर्यग्रहण दर 120 वर्षांनी दिसते. प्लूटो चा चंद्र चेरॉन हा एकटाच पूर्ण सूर्यग्रहण लावण्यास सक्षम असतो.

























































