बारबालांवर पैसे उधळणे हा गुन्हाच! मुंबई पोलिसांचा उच्च न्यायालयात दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारमधील नृत्यांगनांवर पैसे उधळणे हा गुन्हाच आहे. हेदेखील एक प्रकारचे अश्लील कृत्य आहे, असा दावा मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात केला आहे. 2016मध्ये गिरगाव परिसरातील ड्रमबीट बारमध्ये बारबालांवर पैसे उधळणाऱया सुरतच्या दोन व्यापाऱयांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या याचिकेवरील सुनावणी वेळी मुंबई पोलिसांनी हा दावा केला.

या प्रकरणी न्यायमूर्ती पी.डी. नाईक यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी सुनावणी झाली. या वेळी मुंबई पोलिसांतर्फे सरकारी वकील अरफान सैत यांनी बाजू मांडली. त्यांनी पोलिसांकडून व्यापाऱयांवर करण्यात आलेल्या कारवाईचे जोरदार समर्थन केले. 2016मधील हे प्रकरण आहे. गिरगावच्या ड्रमबीट बारमध्ये एक डमी ग्राहक बसला होता. त्याने इतर 15 ग्राहक बारमधील नृत्यांगनांवर पैसे उधळताना पाहिले होते. त्या वेळी ताडदेव पोलिसांनी पुरुषांना अश्लील कृत्य केल्याच्या आरोपावरून अटक केली होती, असे अॅड. सैत यांनी न्यायालयाला सांगितले. याच वेळी त्यांनी बारमध्ये बारबालांवर पैशांची उधळपट्टी करणे हा अश्लीलतेचा गुन्हा असल्याचा दावा केला. याचिकाकर्त्या व्यापाऱयांनी आपण सार्वजनिक ठिकाणी कुठलेही अश्लील कृत्य केलेले नाही. कनिष्ठ न्यायालयांनी या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले, असे म्हणणे मांडले आहे. त्याची न्यायालयाने दखल घेतली आणि दोन्ही व्यापाऱयांना कनिष्ठ न्यायालयात हजेरी लावण्यास सूट देत त्यांना अंतरिम दिलासा दिला.

नेमके प्रकरण काय?
2016मध्ये ताडदेव पोलिसांनी गिरगावच्या ड्रमबीट बारवर छापा टाकला होता. त्या वेळी बार मालक, पॅशिअर, वेटर, कर्मचारी आणि 10 महिला नृत्यांगना व ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच 20 रुपयांच्या 40 नोटा जप्त केल्या होत्या. या प्रकरणात पोलिसांनी भादंवि कलम 294 तसेच बारमधील महिला नृत्यांगनांच्या प्रतिष्ठsच्या संरक्षणासंबंधी कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता.