
देशातील युवा वर्ग हा अराजकतेच्या विरोधात आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच त्यांच्याकडून देशाला खूप अपेक्षा असल्याचे मोदींनी म्हटले. आज पंतप्रधान मोदी यांनी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “सध्या सोशल मीडियाचा काळ आहे. लोक व्यवस्थेचे नियम पाळतात आणि जेव्हा ही व्यवस्था चांगलं काम नाही करत तेव्हा लोकांमध्ये असंतोष निर्माण होते. तेव्हा लोक प्रश्नही उपस्थित करतात.’’ आपल्या देशातील युवा वर्ग अराजकतेच्या विरोधात आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा भेदवार पसंद नसल्याचे मोदींनी सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की “2019 वर्ष हे संपत आहे. आता आपण फक्त नवीन वर्षातच नव्हे तर नवी दशकात प्रवेश करणार आहोत. ज्यांचा जन्म 21 व्या शकता झाला आहे ते देशाला प्रगतीपथावर नेतील असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.

























































