राम मंदिरासाठी देणार 67 एकर जमीन

367

अयोध्येतील भव्य राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारच्या ताब्यात असलेली 67 एकर जमीन मंदिर ट्रस्टकडे हस्तांतरित केली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी वाराणसीत केली. पंतप्रधानांनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. या वेळी त्यांनी राम मंदिर उभारणीबाबत ही आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. राम मंदिर ट्रस्टच्या कामाला गती मिळेल, असेही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने श्रीरामजन्मभूमीचा वाद मिटला आहे. त्यामुळे केंद्र सरकार ही वादग्रस्त जमीन राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्टकडे हस्तांतरित करेल, असे पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीतील कार्यक्रमात स्पष्ट केले.

कलम-370, सीएएवरून मागे हटणार नाही!

आमचे सरकार कलम-370 आणि सुधारित नागरिकत्व कायद्यावरून मागे हटणार नाही. प्रचंड दबावानंतरही सरकारने हे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे यातून आता माघार घेणार नाही. आम्ही या निर्णयावर ठाम राहणार, असा निर्धार पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या