तज्ञांनी मान्यता देताच देशभरात लसीकरण, पंतप्रधान  मोदी यांची माहिती

देशात कोरोनावरील आठ लसींवर काम सुरू आहे त्यातील तीन हिंदुस्थानी आहेत. येत्या काही आठवडय़ात लस उपलब्ध होईल. तज्ञ शास्त्रज्ञ, संशोधक डॉक्टरांनी मान्यता देताच देशात लसीकरणाला सुरूवात होईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत दिली.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ुटसह अहमदाबाद, हैदराबाद येथील लस निर्मिती करणाऱया कंपन्यांना भेट दिली होती. आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पक्षीय नेत्यांची बैठक घेऊन पंतप्रधानांनी लस निर्मितीच्या सध्यस्थितीबाबत माहिती दिली. विविध पक्षाच्या नेत्यांनी यावेळी लसीकरण आणि किंमतीबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

सर्वात आधी लस कोणाला?

कोरोनाग्रस्त रुग्ण, गंभीर आजारी रुग्ण, कोरोनायोद्धे, वयोवृद्ध यांना सर्वात अगोदर

कोरोना लस टोचण्यात येणार असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

आठ लसींची चाचणी सुरू आहे. त्यातील तीन हिंदुस्थानी आहेत. लसीच्या गुणवत्तेबाबत खात्री पटल्यानंतर तज्ञांनी हिरवा कंदील दिल्यानंतर देशात लसीकरणाला सुरूवात होईल.

आपली प्रतिक्रिया द्या