फकीर म्हणवून घेणाऱ्या मोदींच्या मनगटावर महागडे घड्याळ

‘हम तो फकीर है, झोला उठा के चल पडेंगे…’, ‘ये फकिरीही है जिसने मुझे गरिबों के लिए लडने की ताकद दी है…’ मोदींची ही वक्तव्ये आता पुन्हा व्हायरल झाली आहेत. त्यास कारण ठरले आहे, मोदींच्या मनगटावरील महागडे घडय़ाळ. हे घडय़ाळ 55 ते 60 हजार रुपये किमतीचे आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जाहीर कार्यक्रमांमध्ये हे घडय़ाळ मोदींच्या मनगटावर दिसत आहे. ‘जयपूर वॉच कंपनी’चे हे स्वदेशी घडय़ाळ असून ‘रोमन बाग’ हा ब्रँड आहे. या घडय़ाळाच्या डायलवर 1947 सालचे एक रुपयाचे नाणे आहे. या नाण्यावर ऐटीत ‘चालणारा वाघ’ आहे.