पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करणार चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत. या चर्चेत पंतप्रधान लॉकडाऊनचा आढावा घेणार असून या बैठकीत गृहमंत्री अमित शहाही उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दुपारी तीन वाजता राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांशी लॉकडाऊनवर चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदी लॉकडाऊनदरम्यान चौथ्यांदा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणयत आहेत. दुसरा लॉकडाऊन संपण्यापूर्वी 3 मे रोजी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.

कोरोनाचे संकट पाहता लॉकडाऊन वाढवायचा की नाही यावर व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये चर्चा होणार आहे. 17 मे नंतर काय उपाययोजना करता येतील, यावर चर्चा केली जाईल.

1 मे रोजी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत गृह मंत्री अमित शहा, रेल्वे मंत्री पियुष गोयल, अर्थमंत्री निर्मला सीतारमण सह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत दुसर्‍या लॉकडाऊनवर चर्चा झाली होती.