लॉकडाऊन वाढणार की नाही? पंतप्रधान मोदी करणार मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सने चर्चा

709

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी लॉकडाऊनवर चर्चा करणार आहेत. जारी केलेला लॉकडाऊन थांबवायचा की वाढवायचा यावर व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये चर्चा होणार आहे.

नुकतंच अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची विनंती केली आहे. तेलंगाणा आणि ओडिशा सरकारने लॉकडाऊन वाढवला आहे. पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी विरोधी पक्षासह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. देशात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन एका टप्प्यात हटवला जाणार नाही पंतप्रधान मोदींनी जाहीर केले होते.  आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 6 हजार 412 रुग्ण आढळले आहेत. तसेच 199 जणांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या