1 एप्रिलला परीक्षा पे चर्चा, पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून 1 एप्रिल रोजी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे पाचवे पर्व होणार आहे. नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे होणाऱया या कार्यक्रमात विविध परीक्षा पद्धती, तणावविरहित वातावरणात अभ्यास आणि जीवन या विषयावर पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

मागील चार वर्षांपासून ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय शालेय शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. तीन वर्षे हा कार्यक्रम नवी दिल्ली येथे पार पडला. तर गेल्या वर्षी 7 एप्रिलला ऑनलाइन पद्धतीने मोदींनी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमासंबंधी मोदींनी ट्विट केले असून तणावविरहित परीक्षांविषयी पुन्हा एकदा गप्पा मारू. कोरोना प्रादुर्भावात बोर्ड परीक्षांना सामोरे जाणारे एक्झाम वॉरियर्स विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठय़ा संख्येने या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे मोदी ट्विटमध्ये म्हणाले.