
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा संपन्न झाली. चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये सात मोठे करार झाले. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान झालेल्या करारांमध्ये स्थलांतर, आरोग्यसेवा, वैद्यकीय शिक्षण, अन्न सुरक्षा, जहाजबांधणी, रसायने आणि खते यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे.
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी रशियाच्या लोकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी घोषणा केली की, हिंदुस्थानने रशियन लोकांसाठी मोफत ई-टूरिस्ट व्हिसा सुरू केला आहे. हे ई-व्हिसा 30 दिवसांसाठी वैध असतील.
हिंदुस्थान- रशियात कोणते झाले करार?
१. सहकार्य आणि स्थलांतर करार (Agreement on Cooperation and Migration)
२. तात्पुरत्या कामगार उपक्रमांवरील करार (Temporary labour activities)
३. आरोग्यसेवा, वैद्यकीय शिक्षणावरील करार (Agreement on Healthcare, Medical Education)
४. अन्न सुरक्षा आणि मानकांवरील करार (Agreement on Food Safety and Standards)
५. ध्रुवीय जहाजांवरील करार (Agreements on Polar Ships)
६. सागरी सहकार्यावरील करार (Agreements on Meritime Cooperation)
७. खत (Agreement on Fertilizers)





























































