मोदींचे कार्यकर्त्यांना आवाहन, पुढच्या 25 वर्षांच्या तयारीला लागा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा प्रत्येक नागरिक आज सरकारकडून केल्या जाणाऱया कामाचे परिणामही डोळय़ादेखत झाले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करताना दिसत आहे. देशात भाजपचे सरकार आल्यापासून लोकांच्या विचारसणीत होत असलेला हा बदल सकारात्मक असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या 25 वर्षांच्या तयारीला लागा, असे आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केले.

जयपूरमध्ये भाजपच्या देशभरातील पदाधिकाऱयांची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी संबोधित केले. देशवासीयांच्या वाढत्या अपेक्षा, आकांक्षा लक्षात घेऊन भाजपने पुढील 25 वर्षांची उद्दिष्टे निश्चित करायला हवीत. देशातील जनतेच्या भल्यासाठी, समग्र राष्ट्र विकासासाठी निरंतर काम करताना ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ हाच आमचा मंत्र असला पाहिजे, असे मोदी म्हणाले.