मोदी दीर्घकाळ सत्तेत राहणारे चौथे पंतप्रधान; बिगरकाँग्रेस पक्षांतील पहिले मानकरी

531

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर गुरुवारी नव्या विक्रमाची नोंद झाली. ते दिर्घकाळ सत्तेत राहणारे चौथे पंतप्रधान ठरले आहेत. काँग्रेसव्यतिरिक्त इतर पक्षांतील पंतप्रधानांच्या यादीत पहिले स्थान पटकावताना त्यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना मागे टाकले आहे. वाजपेयी हे त्यांच्या सर्व कार्यकालात एकूण 2,268 दिवस पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर होते. मोदींनी गुरुवारी हा किक्रम मोडीत काढला.

मोदी हे 26 मे 2014 पासून पंतप्रधान आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्काखाली भाजपने विजय मिळवला. नंतर 2019 च्या निवडणुकीत भाजपने पुन्हा सत्ता आपल्याकडे राखल्याने मोदी पुन्हा पंतप्रधान बनले. देशात पंडित जवाहरलाल नेहरू हे सर्वात जास्त काळ पंतप्रधानपदी राहिले. त्यांच्यानंतर इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंह यांनी दीर्घकाळ सत्तेत राहण्याची किमया केली. या काँग्रेसच्या तीन पंतप्रधानांनंतर नरेंद्र मोदी हे दीर्घकाळ सत्तेत राहणारे चौथे पंतप्रधान ठरले आहेत. बिगर काँग्रेस पंतप्रधानांच्या यादीत मात्र ते पहिले पंतप्रधान ठरले आहेत. ते यंदा सलग सातव्यांदा लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाला पंतप्रधान म्हणून हिंदुस्थानचा तिरंगा फडकवणार आहेत.

हिंदुस्थानच्या इतिहासात सर्वाधिक 16 वर्षे 286 दिवस इतक्या मोठय़ा कार्यकालात पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर नोंद आहे. ते देशाच्या स्कातंत्र्यापासून त्यांचा मृत्यू होईपर्यंत (27 मे 1964) पंतप्रधानपदी होते.

आपली प्रतिक्रिया द्या