
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका कार्यक्रमात बोलताना मुलींसंदर्भातील सरकारी योजनेचे नाव चुकीचे घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ याऐवजी ‘बेटी बचाओ, बेटी पटाओ’ असे वक्तव्य पंतप्रधानांनी केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही पुन्हा टेलिप्राम्टरची चूक आहे की, पंतप्रधानांचे ‘स्लीप ऑफ टंग’ आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
ब्रम्हाकुमारींनी आयोजित ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी देशाच्या सामाजिक क्षेत्रासह स्वातंत्र्य लढय़ात महिलांचे खूप मोठे योगदान असल्याचे सांगितले. हिंदुस्थानची प्रतिमा सद्या मलीन करण्याचे वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही बरेच काही चालू आहे, हे निव्वळ राजकारण आहे, असे पंतप्रधानांनी म्हणाले. मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार करत असलेली कामे आणि योजनांबद्दल बोलत असताना पंतप्रधान मोदींना ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेचा संदर्भ द्यायचा होता. ही योजना यशस्वी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते असे सांगत असताना मात्र पंतप्रधानांकडून बेटी पढाओ ऐवजी ‘बेटी पटाओ’ असा शब्द उच्चारला गेल्याचे व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. यामुळे योजनेचा अर्थ बदलला.
व्हिडीओ प्रचंड व्हायरल
z पंतप्रधानांच्या या भाषणाचा व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ या घोषणाची चूक पंतप्रधानांकडून कशी होऊ शकते? ही टेलिप्रॉम्टरची चूक आहे की, ‘स्लिप ऑफ टंग’ असा सवाल नेटकरी विचारत आहेत.
z माजी आयएएस अधिकारी सूर्यप्रताप सिंह यांनी ट्विटरवरून पंतप्रधान मोदींचा व्हायरल व्हिडीओ शेअर करीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या टेलिप्रॉम्प्टर प्रकरणाची आठवण करून दिली आहे. ‘बेटी पटाओ’….? आज पुन्हा एकदा टेलिप्रॉम्टरने विश्वासघात केला की काय? अशी खोचक कॅप्शन सूर्यप्रताप सिंह यांनी व्हिडीओला दिली आहे.





























































